Advertisement
HSRP नंबर प्लेट म्हणजेच High Security Number Plate ही सर्व वाहनांना १ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात येणार आहे जर का तुम्ही हि नंबर प्लेट नाही लावली तर RTO च्या नियमांनुसार तुम्हाला फाइन भरावा लागेल.
तुमची गाडी २ व्हिलर असो किंवा ४ व्हिलर या नंबर प्लेट साठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यात तुम्ही ऑनलाइन Appointment घेऊ शकता तसेच Home Delivery घेऊन सुद्धा बसवू शकता.
| होम फिटमेंट सेवेसाठी, “एचएसआरपी प्लेट्स आणि फिटमेंट चार्जेसच्या वर अतिरिक्त शुल्क लागेल” |
| mhhsrp.com हे पोर्टल केवळ ०१.०४.२०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी एचएसआरपी फिटमेंट बुकिंगसाठी आहे. |
| या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या गाडीच्या Dealer कडून सुद्धा HSRP नंबर प्लेट साठी अर्ज करू शकता. |
- नवीन HSRP नंबर प्लेटसाठी mhhsrp.com अधिकृत पोर्टल वर जा. त्यानंतर Book High Security Registration Plate या लिंक वर क्लिक करा.

- Booking Details मध्ये State, Registration Number, Chassis Number, Engine No., Mobile Number आणि Captcha टाकून Click Here वर क्लिक करा.

- Affixation Location मध्ये तुमचे ठिकाण निवडून Dealer निवडा.

- Appointment Slot मध्ये तुम्हाला हव्या त्या योग्य वेळेनुसार तारीख आणि वेळ निवडा.

- Booking Summary मध्ये तुमची माहिती तपासून Confirm & Proceed करा.

- Verify Details & Pay मध्ये तुम्हाला HSRP नंबर प्लेट साठी लागणारे शुल्क दिसेल ते भरण्यासाठी Pay Online वर क्लिक करा.

- Download Receipt मध्ये शेवटी तुमची HSRP Appointment Receipt डाउनलोड करा.

Advertisement