Advertisement
माझी लाडकी बहिन योजना, ज्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना म्हणूनही ओळखले जाते, ही महाराष्ट्र सरकारची नवीनच योजना आहे. ज्यात राज्यातील गरीब व गरजू महिलांना आर्थिक पाठींबा देण्याचे उद्दिष्ट आहे. या योजने सारखीच लाडली बहना योजना मध्यप्रदेश राज्यात चालू आहे.
| योजनेचा लाभ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा ₹१,५०० म्हणजेच वर्षाला ₹१८,००० थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात मिळतील. तसेच वर्षाला ३ गॅस सीलेंडर मोफत मिळेल. |
Important Dates
| अर्ज भरण्यास सुरूवात >> | १ जुलै २०२४ |
| अंतिम तारीख >> | १५ ऑक्टोबर २०२४ |
New Update
| लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारणे बंद झाले आहे तुम्ही १५ ऑक्टोबर पर्यंत तुमच्या नजीकच्या अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करू शकता |
माझी लाडकी बहिन योजनेसाठी पात्रता
- महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- नुकतीच वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. तुमचे वय १८ ते ६५ दरम्यान असणे आवश्यक आहे.
- तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा आयकरदाता नसावा.
- ट्रॅक्टर सोडून घरात इतर कोणतेही चारचाकी वाहन नसावे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र /जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला *
- अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षापूर्वीचे (१) राशनकार्ड (२) मतदार ओळखपत्र (३) जन्म प्रमाणपत्र (४) शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड *
- अर्जदाराचे हमीपत्र *
- बँक पासबुक *
- अर्जदाराचा फोटो *
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र / 15 वर्षापूर्वीचे (१) राशनकार्ड (२) मतदार ओळखपत्र (३) जन्म प्रमाणपत्र (४) शाळा सोडल्याचा दाखला
Note – तुम्ही आपले सरकार पोर्टलवर उत्पन्न, अधिवास, जन्म, जात आणि इतर प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
अर्ज कुठे करावा
Online (ऑनलाइन)
- ऑनलाइन अर्ज Narishakti Doot या ऍप आणि ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइट वर करता येईल.
| Mazi Ladki Bahin Yojana Official Website Link |
| ladakibahin.maharashtra.gov.in |
Offline (ऑफलाईन)
- ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करावा.
- शहरी भागातील महिलांनी त्यांच्या वॉर्ड अधिकाऱ्याकडे अर्ज करावा.
Ladki Bahin Installment Dates
| Installment | Date |
| 1st Installment (जुलै) 2nd Installment (ऑगस्ट) (Released) | 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 ₹3000 (दोन महिन्यांचा हप्ता जुलै/ऑगस्ट) |
| 3rd Installment (सप्टेंबर) (Released) | 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 ₹1500 आणि ₹4500 |
| 4th Installment (ऑक्टोबर) 5th Installment (नोव्हेंबर) (Released) | 4 ऑक्टोबर 2024 (दोन महिन्यांचा हप्ता ऑक्टोबर/नोव्हेंबर) ₹ 3000 |
| 6th Installment (डिसेंबर) (Released) | 25 डिसेंबर 2024 ₹ 1500 |
| 7th Installment (जानेवारी) (Released) | 25 जानेवारी 2024 ₹ 1500 |
संबंधित लेख
| >> Nari Shakti Doot (लाडकी बहीण योजना) – Apply Online | >> लाडका भाऊ योजना Apply Online, पात्रता |
| >> मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CMYKPY | – |
Advertisement